
विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका…
प्रतिनिधी -दीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड, वाडा आणि जव्हार मोखाडा ग्रामीण भागांत झालेल्या अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान झाले. रविवारी व सोमवार अशा सलग दोन दिवसांत या भागांत अवकाळी पाउस झाला.
पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी भेंडी, गवार, काकडी, कारली अशा वेगवेगळ्या फळ, वेलवर्गीय रोपांची लागवड केली आहे. पावसाने, गारपिटीने ही लागवड झोडपून काढल्याने आगामी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. ग्रामीण भागात शेतकरी दिवाळीनंतर भात झोडणीची कामे सुरू केली जातात. पावसाळ्यात गोधनासाठी लागणाऱ्या पेंढ्याची तयारी करून ठेवतो. भातमळणी सुरू असतानाच रविवारी सकाळी पासून अचानक पाऊस सुरू झाल्याने भाताचे नुकसान झाले आहे. खळ्यावर ठेवलेल्या भात पिकाच्या पेंढ्या पावसात भिजल्याने हातातोंडाशी आलेले पीक गेल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
भात पिके कापून झाल्यानंतर शेतकरी हरभरा, वाल, मूग, माळरानावर भेंडी, कारली, वांगी, गवार अशा पिकांची नव्याने लागवड करतो. आता नव्याने केलेली ही लागवड रविवारी सकाळी व संध्याकाळी च्या मुसळधार पावसात, विक्रमगड जव्हार मोखाडा वाडा भागात गारपिटीने पाऊस झोडपली आहे. त्यामुळे या रोपांची पुन्हा लागवड करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
Total Users : 10829