
त्र्यंबकेश्वरच्या महावितरण एजन्सी कर्मचाऱ्यांवर संघटनेची कारवाईची मागणी..
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
महावितरण एजन्सी कर्मचाऱ्यांचे मनमानी कारभार ग्रामीण भागामध्ये वेळेवर रीडिंग घेतली जात नाही तसेच लाईट बिल 3 ते 4 महिने होऊन जातात तरी लाईट बिल ग्राहकांना मिळत नाहीत ग्राहकांना वेळेवर लाईट बिल मिळत नाही त्यामुळे ग्राहकांना भुरदंड भरावा लागतो. नांदगाव कोहळी, खुटपाडा, वैतागवाडी, हेदअंबा, मेट कावरा,हेदपाडा,तोरंगण या गावांमध्ये बारा महिने झाले लाईट बिल मिळालेले नाहीत. त्यामुळे या संबंधित बिल वाटप एजन्सी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे तसेच वेळुंजे ,बोंबीलटेक, अंजनेरी, मुळेगाव, गाजरवाडी, या गावांमध्ये 3 महिने झाले लाईट बिल दिलेलेच नाहीत असे अनेक त्रंबकेश्वर तालुक्यांमध्ये गाव आहेत की लाईट बिल वेळेवर पोहोचत नाहीत त्यामुळे या कामचुकार एजन्सी वरती कारवाई झालीच पाहिजे. 5 दिवसात कारवाई झाली नाही तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटने कडून महावितरण वरती आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Total Users : 10829