
राजस्तरीय ठाणे येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत कु. चेतना हरपाले हिची पालघर जिल्ह्यातून निवड…..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड- विरार येथे झालेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी असोसिएशन क्रीडा स्पर्धेअंतर्गत चाचणीमधून डोल्हारी बुद्रूक गावची व जि.प.शाळा डोल्हारी बुद्रूक शाळेतील माजी विद्यार्थीनी व अरविंद आश्रमशाळा दादडे येथे शिकणारी कु.चेतना हरपाले हिची ठाणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन क्रीडा स्पर्धेत पालघर जिल्हा संघातून खेळण्यास निवड करण्यात आली.
चेतना ही लहान पणापासूनच शाळेमधून जि. प. शाळा डोल्हारी बुद्रुक या ठिकाणाहून त्याची योग्य रीतीने तयारी करण्यात आली यासाठी योग्य रीतीने मार्गदर्शन करणारे श्री. संतोष उमतोल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून तिला कबड्डी स्पर्धेत हुशारपणा येऊन आणि तिला हिंमत तसेच मेहनत ही मनापासुम असायची आणि म्हणूनच आज तिची निवड योग्य त्या ठिकाणी राज्यस्तरीय वरती झालेली आहे.
आणि म्हणूनच या निवडी बद्दल डोल्हारी बुद्रूक गावातून तसेच संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि पुढील वाटचाली साठी चालना तसेच प्रेरणा सुद्धा मिळत आहेत.
Total Users : 10829