
पालघर जिल्हा भारतीय ट्रायबल पार्टीचे संजय रघुनाथ घाटाळ उपाध्यक्षाची निवड …
प्रतिनिधीji 4 news -दीपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्हा भारतीय ट्रायबल पार्टीचे उपाध्यक्ष राहिलेले माननीय संजय रघुनाथ घाटाल यांना पक्षप्रमुख आदरणीय महेश भाई वसावा, संस्थापक आदरणीय छोटूभाई वसावा यांनी पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे पालघर जिल्ह्यातील कमिटी करणे आता त्यांची जबाबदारी आहे आणि ते पार पाडतील सर्व विश्वास पक्ष श्रेष्ठींनी केला आहे विविध विषयावर चर्चा करून भविष्यातील अंदाज घेऊन आदरणीय संजय घाटाल यांची पालघर जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक केली आहे माननीय संजय घाटल हे सतत आदिवासी समाज बांधवांच्या संपर्कात असून आंदोलनात सहभागी असतात यांचे टीम वर्क देखील चांगले आहे. आपल्या समाज हिताची कामे करण्यास त्यांचा पुढाकार असून हात भार असतो, देहरजे गावचे असलेले संजय घाटाल हे गावात लोक प्रिय असून जव्हार , मोखाडा, खोडाला वाडा,वसई , भिवंडी,शहापूर तालुक्यात त्यांचा दाडंगा जण संपर्क असून त्यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने निर्माण होणारी कमिटी ही देखील योग्य व्यक्तीची निवड करूनच होईल जुनी कमिटी देखील फेरफार होऊ शकतात संजय घाटाल हे उपाध्यक्ष हिते अध्यक्ष निवड झाल्याने उपाध्यक्ष पद रिक्त झाल्या असून लवकरच तेही कार्यरत असलेल्या व्यक्ति मधून नियुक्त केले जाईल
पक्षश्रेष्टी सोबत दीर्घ वेळ चर्चा करून पालघर जिल्हा स्थानिक पातळीवर लोकसभेची जबाबदारी आणि विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे राष्ट्रीय पातळीवर निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील पण पालघर जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याची पक्ष वाढवण्याचे निर्णय पालघर जिल्हा अध्यक्ष घेतील आणि पक्ष बांधणीचे योग्य तसेच निर्णय घेतील जिल्ह्यातील समस्या विविध प्रश्न यांचा अभ्यास करून पालघर जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याचे आदेश देऊन आपले आशीर्वाद असतील असे पक्ष श्रेष्ठींनी चर्चा करताना नमूद केले आहे माननीय संजय घाटाल यांची पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पालघर जिल्ह्यात सर्व स्थरातून तून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, जय सेवा जोहार जय आदिवासी
Total Users : 10829