भारतीय ट्रायबल पार्टी,संघटनेमध्ये संजय घाटाळ साहेब यांची पालघर जिल्हा अध्यक्ष पदी म्हणून निवड…
भारतीय ट्रायबल पार्टी या संघटनेमध्ये संजय घाटाळ साहेब यांची पालघर जिल्हा अध्यक्ष पदी म्हणून निवड…….
विक्रमगड प्रतिनिधी ji24news- प्रशांत दाव्हाड.
विक्रमगड – जय जोहार जय आदिवासी या ब्रीदय वाक्याची घोषणा देऊन विक्रमगड तालुक्यातील देहर्जे गावचे सुपुत्र श्री. संजय रघुनाथ घाटाळ साहेब यांची पालघर जिल्ह्यामधून भारतीय ट्रायबल पार्टी या कमिटीमधून अध्यक्ष पदी निवड करून विक्रमगड मध्ये रॅली काढण्यात आली. . या रॅली मध्ये जय जोहार जय आदिवासी या ब्रीदय वाक्याची घोषणा देत पाटीलपाडा ते तारपा चौक नगरपंचायत येथे पर्यंत रॅली काढण्यात आली आणि येथे भारतीय ट्रायबल पार्टीची कमिटी एकत्र होऊन आणि आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारावर त्यांनी पुढील पाऊल उचलून आणि न्याय हक्क मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतीय ट्रायबल पार्टीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडाजी, विरंगना झलकरी बाई, रानी दुर्गावती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिवीर नाग्या कातकरी आणि जननायक तंट्या भाऊसिंग भिल यांना फुले वाहून आणि त्यांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि मुख्य कार्यकारी नेते मोहन बारकू गुहे आणि यांची टीम यांनी पाटिलपाडा ते तारपा चौक नगरपंचायत विक्रमगड या ठिकाणापर्यंत रॅली काढून आणि आदिवासी समाजावार येणाऱ्या समस्या आम्ही सोडवू त्या मध्ये शिक्षक पेसा भरती, तसेच इतर पेसा भरती अश्या अनेक काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवू असे त्यांनी आंबेघर पाटिलपाडा येथे त्यांनी झालेल्या सभेत घोषणा केली. यामध्ये भारतीय ट्रायबल पार्टीचे मुख्य नेते मोहन बारकू गुहे आणि सर्व नेते तसेच अध्यक्ष स्थान पद स्वीकारून संजय रघुनाथ घाटाळ हे सर्व उपस्थित होते.सर्व आदिवासी समाजाकडून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे .