ji24news

प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार, दिव्यांग क्रांती संघटना व प्रगती प्रतिष्ठान च्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार, दिव्यांग क्रांती संघटना व प्रगती प्रतिष्ठान च्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी.

प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालुका दिव्यांग क्रांती संघटना व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल.मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय जव्हार येथे आज ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली असून सदर स्पर्धेत कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर दिव्यांग दिनानिमित्त हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून निलेश ल.मुर्डेश्वर करण्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम पाटील, प्रगती प्रतिष्ठानचे कार्यकारी सचिव अनिल डिंगोरे, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग जाधव, व कर्मचारी वृंद, दैनिक सकाळ प्रतिनिधी संदीप साळवे, पत्रकार गणेश कलिंगडा, संजय वाघ, प्रमोद मौळे,शंकर नवघरे, प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालुका कार्याध्यक्ष विश्वास भरीत जव्हार तालूका अध्यक्ष मनोज कामडी,सचिव कल्पेश खुरकुटे, दिव्यांग क्रांती संघटना जव्हार तालुकाध्यक्ष महेंद्र दुधेडा,जयेश मोरघा, मोखाडा तालुक्यातील गणपत पागारे, शिवराम गोविंद, व समता फाउंडेशन जव्हार तालूका प्रकल्प समनव्यक अंकुश टोकरे ,राहुल कामडी, विजय गावित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग दिनाचे महत्व,विविध शासकीय योजना ,दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे, दिव्यांग बांधव स्वतःचा स्वयं रोजगार कसा सुरू करू शकतो व ३ डिसेंबर आंतरराष्ट्रीय जागतिक दिनानिमित्त मार्गदर्शनपर सर्व दिव्यांग बांधवाना शुभेच्छा दिल्या तसेच जव्हार व मोखाडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालूका अध्यक्ष, कार्याध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी समता फाउंडेशनच्या वतीने आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वाटप शिबीर आयोजित केले असून यावेळी १५० दिव्यांग बांधवांना आयुष्मान भारत कार्ड ची नोंदणी करून कार्डचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी डॉ.राहुल कामडी उपजिल्हा रुग्णालय जव्हार यांनी उपस्थित राहून डोळ्याने दिव्यांग असलेल्या बांधवांची तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणीसाठी मार्गदर्शन केले.”तसेच उपस्थित दिव्यांग बांधवापैकी ७२ दिव्यांग बांधवासाठी नवीन प्रमाणपत्र करिता नोंदणी करून कागदपत्रे गोळा करण्यात आली.सदर कार्यक्रमा प्रसंगी जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातून जवळपास ३०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जव्हार तालूका सदस्य सुनील टोपले ,अनिल दिघा, अंकुश खरपडे ,गणेश दळवी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार तालूका संघटक लक्ष्मण पारधी यांनी केले. शेवटी सर्व दिव्यांग बांधवाना गोड स्नेह भोजन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर