
औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे संविधान गुणगौरव परीक्षा – २०२३ उत्साहात संपन्न.
जव्हार प्रतिनिधी-ji2 4 news
आज दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार व संविधान प्रचार व प्रसार मंच जव्हार यांचे संयुक्त विद्यमाने रक्षित सामाजिक संस्था अंतर्गत स्थापित संविधान गुणगौरव समिती यांचे मार्फत घेण्यात येणारी संविधान गुणगौरव परीक्षा – २०२३ उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सामुहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून तहसीलदार जव्हार लता धोत्रे यांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे पाकिट उघडण्यात आले व परीक्षार्थींना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुनिल वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जोशी व मनोज कामडी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम आधिकारी दिनेशकुमार पडवळ सर यांनी प्रस्ताविक केले यात हे वर्ष संविधान दिनाचे अमुत महोत्सवी वर्ष आहे. आज संविधान साक्षर होणे किती गरजेचे आहे हे सांगुन जर प्रश्न पडले तर उत्तरासाठी संविधानाचे वाचन होईल व संविधानाचा प्रचार प्रसार होईल हे थोडक्यात स्पष्ट केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम प्राचार्य शाम अंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिनेशकुमार पडवळ सर तालुका समन्वयक, महम्मद तोयब सत्तार मेमन सर केंद्र प्रमुख म्हणून काम पाहिले. व राजेश हरळ सर, शशिराज बाविस्कर सर, राकेश कोळंबकर सर, प्रविण मढावी सर, रुपाली ताटे, स्वप्नाली महाले यांनी पर्यवेक्षक म्हणून सहकार्य लाभले.
या केंद्रात ३८ मुली व ४२ मुले एकुण ८० जणांनी परीक्षा दिली.
Total Users : 10829