खोडाळ्यात संयुक्त जयंती व वाघबारस कार्यक्रम संपन्न…
खोडाळ्यात संयुक्त जयंती व वाघबारस कार्यक्रम संपन्न…
पालघर :सौरभ कामडी
खोडाळा:- महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र आयोजित संयुक्त जयंती व वाघबारस महोत्सव या वर्षी खोडाळा शहरात आयोजित करण्यात आला होता या महोत्सव कार्यक्रमात आद्यक्रांती वीर राघोजी भांगरे,जननायक धरती आबा बिरसा मुंडा व श्रीमंत राजे मार्तंडरावं मल्हाररावं मुकणे महाराज व गणपतरावं मल्हाररावं मुकणे महाराज महाराजा ऑफ जव्हार संस्थान(जयहर) या महापुरुषाच्या जयंती ही मोठया प्रमाणात साजरी करण्यात आली त्याच प्रमाणे आदिवासी महादेव कोळी समाजातील एक पारंपारिक वाघबारस महोत्सव ही साजरा करण्यात आला यात आदिवासी संस्कृतीच दर्शन समाजाला घडवण्याचं काम या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले, यावेळी मोखाडा,जव्हार,विक्रमगड वाडा नाशिक,ठाणे या विविध ठिकाणातून आपले समाज बांधव हे कार्यक्रमात सहभागी झाले होते यात समाजाच्या इतिहासावर चर्चा तसेच सामाजिक प्रश्न पेसा भरती,आदिवासी समाजामध्ये होणारी घुसखोरी इत्यादीवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी चिमुकले साधना नवले व पियुष गवारी या दोन बालकानं भाषणांनी कार्यक्रमाला सुरवात झाली व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर गवारी यांनी केले यात उपसभापती प्रदीप वाघ,जिल्हा परिषद सदस्य कुसुम ताई झोले,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले,माजी सरपंच प्रभाकर पाटील, शिवाजी गोडे,रागशे सर,स्वप्नील भवारी, आकाश दांडेकर, यांनी आपले विचार समाजापुढे मांडले सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजय शेळकंदे,,मगन पाटील,संतोष हमरे,जनार्दन पाटील,युवराज साळकर,संदीप पाटील,दत्ता झिंझुर्डे,दिगम्बर (अप्पा ) पाटील,दिलीप जागले, खोडाला ग्रामपंचायत सरपंच कविता ताई पाटील,उमाकांत हमरे, डॉ.सागर मुकणे, बांडे भाऊ नामदेव टेंगचे इंजी.भावेश पाटील,प्रदीप वारघडे,आकाश गारे, आनंद शिंदे इत्यादी उपस्थित होते.व या सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे होते. सचिन पाटील कार्याध्यक्ष महादेव कोळी समाज उन्नती मंडळ:- वाघबारस व संयुक्त जयंती उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या संस्कृती परंपरा संवर्धन व क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रम खोडाळा या ठिकाणी पार पडला यात आदिवासी समाजातील रीती रिवाज चालिरिती व संस्कृती जतन करण्याचं काम व येणाऱ्या पुढील पिढीला आपली आदिवासी संस्कृती माहित व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन दर वर्षी संघटनेकडून करण्यात येते यात विविध सामाजिक विषयावर ही चर्चा केली जाते व त्या सोडवण्याचं काम ही केले जाते यात कोणतेही राजकारण केले जात नाही यात सर्व पक्षाचे त्याचं प्रमाणे संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत आपली संस्कृती जतन करण्याचं काम करतात असे वक्तव्य पत्रकाराशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केले.