मातोश्री हॉस्पिटल महादेव आळी जव्हार येथे उदघाटन…..
मातोश्री हॉस्पिटल महादेव आळी जव्हार येथे उदघाटन…..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – आजच्या युगामध्ये डॉक्टर यांना देवाचे स्थान दिले जाते कारण डॉक्टर हे रुग्णांना जीवदान देत असतात या साठी विविध स्पेसिअल डॉक्टर कोर्स करत असतात आणि या विविध आजारी रुग्णांना योग्य रीतीने त्यांचे आजार दूर करून आणि त्यांना नवीन जीवन देतात असे बोलायला हरकत नाही. . तर याच पद्धतीने वरदविनायक रेसिडेन्सी, जुन्या गॅस एजन्सी समोर, महादेव आळी, जव्हार येथे मातोश्री हॉस्पिटलचे दिनांक ०३/१२/२०२३ रोजी उदघाटन करण्यात आले. या हॉस्पिटल मध्ये विविध आजारावराती उपचार केले जातील यामध्ये हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आजार, फुप्फूसाचे आजार, पोट व किडनीचे आजार, मेंदूचे आजार, सांधि – वात सर्पदंश व विषबाधा, यकृत व पिताचे आजार तसेच येथे मेडिकल आय. सी. यु. बालरोग कक्ष तसेच स्त्री – पुरुष यांना जनरल वोर्डची २४ तास सुविधा उपलब्ध आहे. तसेच लवकरच एक्स – रे, टू – डी इको तपास व सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार आहे. . आणि यासाठी असणारे तज्ञ डॉक्टर डॉ. प्रवीण वसंत भोये साहेब, एम. बी. बी. एस./ एम. डी. मेडिसिन, डॉ. जयश्री प्रवीण भोये – भुसारा मॅडम एम. बी. बी. एस./ एम. डी. बालरोग तज्ञ्, डॉ. सचिन वसंत भोये साहेब एम. बी. बी. एस./ एम. डी. बालरोग तज्ञ् डॉ. पंढरीनाथ खाडे साहेब एम. बी. बी. एस./ त्वचारोग तज्ञ्, डॉ. प्रशांत भुसारा साहेब एम. बी. बी. एस./ रेडिओलॉजिस्ट, डॉ. रोहित अंभीरे साहेब बी. एच एस./ होमिओपॅथीक तज्ञ् तसेच मातोश्री हॉस्पिटल व कर्मचारी वृंद या हॉस्पिटल मध्ये तत्पर सेवेसाठी असणार आहेत. . या हॉस्पिटलचे उदघाटन करण्यासाठी डॉ. रामदास मराड साहेब, तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भरत महाले साहेब यांच्या हस्ते होणार होते परंतु काही कारणस्थव त्यांना यायला जमले नव्हते, म्हणून डॉ. प्रशांत भडांगे, साहेब तसेच डॉ. अनिता पाटील मॅडम, सचिन पळसकर साहेब श्रावण खरपडे साहेब तसेच डॉ. राहुल केगाण साहेब (नाशिक ) आदी उपस्थित होते.