
अनुसूचित जमातीच्या युवतींसाठी भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण
जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी
अनुसूचित जमातीच्या युवतीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, , यांच्यामार्फत भारतीपुर्व पोलीस दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे पळसुंडे ता. मोखाडा जि. पालघर येथे सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहे. प्रथम पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे प्रत्यक्षात भोजनाची व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे तसे प्रशिक्षणार्थ्यांना कळविण्यात येईल, तरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या युवतीनी दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता शारिरीक पात्रता चाचणीसाठी सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र, पळसुंडे ता. मोखाडा जि. पालघर येथे उपस्थित राहावे.
सदर निवड प्रक्रिया खालील नमुद केलेल्या वेळापत्रकानुसार होईल.
शारीरिक चाचणी : दिनांक 12 डिसेंबर 2023
सदर चाचणीत पात्र युवतीची लेखी परिक्षा : दिनांक 13 डिसेंबर 2023
अंतिम निवड यादी : दिनांक 15 डिसेंबर 2023.
सदरच्या निवड प्रक्रियासाठी खालीलप्रमाणे नमुद केलेले सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणावी निवड
प्रक्रियासाठी येण्या-जाण्याचा किंवा राहण्याचा कोणताही भत्ता या कार्यालयाकडून देण्यात येणार नाही.
शाळा सोडल्याचा दाखला, इ.12 वी. पास गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, नाव नोंदणी प्रमाणपत्र.इत्यादी प्रमाणपत्र आवश्यक आहेत
Total Users : 10829