विक्रमगड मध्ये दिल्ली येथून आलेल्या पाहुण्यांनी गाव आणि शाळेला दिली भेट..
विक्रमगड मध्ये दिल्ली येथून आलेल्या पाहुण्यांनी गाव आणि शाळेला दिली भेट….
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड मधील 50 गावांमध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालत असलेल्या “हमारा गाव” मधील काही गावामध्ये दिल्ली येथून आलेल्या प्रथम चे सेंट्रल टीम चे राकेश चव्हाण सर यांनी भगतपाडा,पालवपाडा, धामणी पाटीलपाडा या गावातील मुलांसोबत चर्चा केली.तसेच शिक्षकासोबत शिक्षणासंदर्भात चर्चा केली.यावेळी त्यांनी लर्निंग कॅम्प मधील मुलांच्या प्रगती विषयी जाणून घेतले.तसेच गावातील संध्याकाळी अभ्यास करण्यासाठी बसत असलेल्या ‘चिड्रेन क्लब’ मधील मुलांसोबत चर्चा करण्यात आली आणि त्या गटाला स्वयंमसेवक म्हणून मदत करणाऱ्या मातासोबत चर्चा केली .तसेच विक्रमगड मधील FLN अंतर्गत चालत असणाऱ्या काही गावांमधील मातासोबत मुलांच्या शिक्षणा संदर्भात चर्चा केली. यावेळी प्रथमचे सेंट्रल टीमचे राकेश चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षका सोबत चर्चा केली. यावेळी प्रथम चे SC&TA तोफिक सय्यद सर,मनिषा गावित मॅडम, FLN कोकण विभाग चे प्रशांत गवळे सर, भगतपाडा शाळेचे मुख्यध्यापक इलाही शेख सर ,धामणी( पाटीलपाडा) शाळेचे शिक्षक पाटील सर,सोपान कळूषे सर,प्रथम प्रतिनिधी गोपीनाथ कोदे,दिपक हिलीम, संजय दातेला,राजू गिंभळ उपस्थित होते.