
जव्हार चालतवड येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
जव्हार : सुनिल जाबर
दीन,दुबळे ,अनाथ ,अपगांची सेवा करणारे व अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल व सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावोगावी जावून जागरूकता निर्माण करणारे असे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी जव्हार तालुक्यातील चालतवड येथे दिनांक २०डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
गाडगे महाराज आणि महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकारद्वारे अनेक नागरिकांना संदेश दिले होते त्यातच एक चालतवड मधील नागरिकांनी व शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवून रॅली काढून त्यामध्ये चोरी करू नका,व्यसनाच्या अधीन होवू नका,लहान वयात लग्न करू नये,राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय अश्या विविध प्रकारच्या घोषणा देवून व बॅनर लावून लोकांपर्यंत खूप छान संदेश पोहचविण्याचे काम केले आहे तसेच नृत्य सादर करून गाडगे महाराज पुण्यतिथी मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी चालतवड ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच अनिता चौधरी मॅडम, गाडगे आश्रमशाळा चालतवड शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर संचालक विष्णु भाऊ नाचवणे,ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापक भांगरे सर दीपके सर युनिव्हर्सल कॉलेज चे प्राध्यापक विकास भोये सर, जाबर सर तसेच शाळेचे इतर सर्व शिक्षक व विद्यार्थि आणि गावातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
Total Users : 10828