
कुमारी वैदेही महाकाळ हिचा वाढदिवस अनोखा साजरा….
वाढदिवशी थोर महापुरुषांच्या प्रतिमा दिल्या भेट.
विद्यार्थी व रुग्णांना ही फळे वाटप
प्रतिनिधी ;-दीपक भोये विक्रमगड.
दि.२१डिसेंबर २०२३.
विक्रमगड तालुक्यातील वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांच्या मुलीचा वाढदिवस गुरुवारी सेवाभावी उपक्रमाने जल्लोषात साजरा झाला. त्यांची कन्या वैदेही महाकाळ हिच्या २१ डिसेंबर २०२३ रोजी वाढदिवसानिमित्त मोखाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री. प्रदिप गिते साहेब यांच्या कडे महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.तसेच ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे फळे, बिस्कीट वाटप करण्यात आली, तसेच प्रगती प्रतिष्ठा संचलित कर्ण बधिर विद्यालय जव्हार मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक टीम यांच्या उपस्थित मुलांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले व विक्रमगड पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक मा.श्री. रविंद्र पारखे साहेब यांच्या उपस्थित महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या व ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रमृद्धी पाटील मॅडम व स्टाफ यांच्या उपस्थित रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच वाकी – मलवाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या अधिक्षिका सौ.मंगला तेलगोडे मॅडम व कर्मचारी यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना फळे, व पेन वाटप करण्यात आले….
याप्रसंगी मनोज कामडी सर, अशोक राऊत, प्रमोद मौळे,भरत धामोडा,अजय गायकवाड, गणेश सापटा, प्रदिप सापटा, अविनाश निंबारे, राहूल फाफाणे, कुणाला भोये,प्रकाश वरठा, अविनाश टोकरे, भूषण महाकाळ, यतिन मिसाळ, स्वप्नील गावित, अविनाश महाले आदी उपस्थित होते.
Total Users : 10829