
साईबाबा लोकप्रबोधन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी -वर्धा
वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम पारेकर उपप्राचार्या डॉ.सारीका चौधरी ,डॉ.विनोद मुडे ,डॉ.पंकज मून ,सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ.प्रवीण कारंजकर मंचावरती उपस्थित होते .
यावेळी वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आणि कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असून स्त्रीशिक्षणाचा मार्ग त्यांच्या मुळे सर्वासाठी मोकळा झाला असे विचार मंचावरील वक्त्यांनी मांडले .यावेळी सावित्रीबाई फुलेची वेशभूषा महाविद्यालयातील विद्यार्थीनिनी केली होती .त्यासोबतच सावित्रीबाई फुलेच्या जीवनवरती आधारित प्रश्न मंजुषा कार्यक्रमही संपन्न झाला यास्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थीनीना प्रमाणपत्र आणि यशस्वी विद्यार्थीनीना बक्षिस देण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीचे सहसमन्वयक डॉ.नितेश तेलहांडे, यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाला डॉ.नरेश भोयर , ,डॉ.गणेश बहादे, डॉ.विठ्ठल घिनमीने,डॉ.नितेश तेलहांडे,डॉ.संजय दिवेकर ,आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
Total Users : 10829