दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हिवाळ्याचे वातावरण जोरात….
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हिवाळ्याचे वातावरण जोरात….. विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड विक्रमगड – वर्षाचे तीन ऋतू पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा असे आहेत आणि या ऋतू मध्ये आजारी पडण्याचे वातावरण राहते पावसाळ्यात जास्त पाऊस पडला की सर्दी, खोकला, ताप आणि तसेच हिवाळ्यात सुद्धा जास्त थंडी पडल्याने दंव पडत असतो, आणि थंडी जास्त प्रमाणात वाढली की, सर्दी, ताप, असे विविध आजार पडत असतात. हे आजार होऊ नये यासाठी घ्यायची काळजी म्हणजे घराबाहेर वाहनाने बाहेर जाताना स्वेटर चा वापर करावा तसेच हात रुमाल वैगरे याचा वापर करावा हे तर वातावरण आपल्याला माहिती आहे आणि काळजी कशी घ्यायची हे सुध्दा माहिती आहे परंतु तरी सुध्दा एक हा संदेश आपण घेऊन आणि काळजी घेवून स्वतःची निगा कधी राखता येईल याची दक्षता घ्या.