जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे सावित्रीच्या लेकिंचा सन्मान.
जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे सावित्रीच्या लेकिंचा सन्मान.
पालघर प्रतिनिधी – ji24news सौरभ कामडी पालघर – मोखाडा – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे ३जानेवारी आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, मुलींच्या शिक्षणाची सावित्रीबाईंनी मुहूर्तमेढ रोवली आणि आणि आज त्याच फलित म्हणून देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत . शाळेतील मुलींना शिक्षणाचे महत्व समजावून देण्यासाठी परिसरातील कर्तबगार महिला , कारेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती नीलिमा पवार , परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, यांना शाळेत बोलावून त्यांचा आज जयंती निमित्त सत्कार करण्यात आला . विद्यार्थिनींना या सावित्रीच्या लेकींचा आदर्श घेण्याचे आव्हान करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. गणेश वाघ सर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे सर , राजाराम जोशी सर, दिनेश ठोमरे सर उपस्थित होते,