
तरुण बेरोजगार व महिला बचत गटासाठी मार्गदर्शन शिबिर….
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड ji24news.
जव्हार तालुक्यातील ॲग्रो प्रोडयुसर कंपनी व ग्रामपंचायत पिंपळशेत/ चांभारशेत मार्फत तरुण बेरोजगार, शेतकरी वर्ग व महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजन पिंपळशेत ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले होते यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री.जगदीश भाऊ धोडी साहेब मा.उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ (राज्यमंत्री दर्जा) यांस कडून धारती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस वंदन करून विषयस सुरुवात करण्यात आली विषय १) तरुण वर्गाला स्वयंम रोजगार कसा उपलब्ध करून देता येतील / महिला बचत गट ह्यासाठी लघु उद्योग निर्मिती कशी करता येईल.२) तरुण वर्गासाठी पालघर जिल्ह्यात बोईसर MIDC मध्ये रोजगार उपलब्ध करून देणे.३) गाव पातळीवरच्या समस्या बाबत विषय मांडणे* इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सागर भाऊ धोडी साहेब,विनू दादा मौळे युवा आदिवासी संघ संस्थापक /युवा आदिवासी संघ वरिष्ठ सल्लागार व सामाजिक कार्यकर्ता, अशोक दादा राऊत कोकदा ग्रामपंचायत उपसरपंच,गणपत दादा भेस्कर अध्यक्ष मिशन वंदेमातरम,रतीलाल दादा पडवळे मा.सरपंच चांभारशेत ग्रामपंचायत, प्रमोद दादा मौळे पत्रकार, पांडुरंग चौधरी, सौ.प्राची शेंडे ग्रामपंचायत सदस्य पिंपळशेत, रमेश जाधव व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ उपस्थित होते
Total Users : 10829