
डहाणू येथे 29 जानेवारी रोजी युवक-युवतीकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन…
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड ji24news
पालघर दि. 23 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर या कार्यालया अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता के.एल.पोंदा हायस्कूल, डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथे युवक-युवतींकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात बोईसर, पालघर, व वसई येथील MIDC मध्ये कार्यरत 10 वी, 12 वी पास / नापास, डिप्लोमा, आय.टी.आय. बी.एड, डी.एड, कृषी, कौशल्यविकास, बँकिंग क्षेत्रात कार्यरत अश्या एकूण 15 कंपनी सहभागी होणार असून, त्यांच्याकडे एकूण 3142 जागा रिक्त असल्याचे कळविले आहे.
या रोजगार मेळाव्यांमुळे जवळपास 3142 युवक-युवतींना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांनी केले आहे.
Total Users : 10829