
पालघर ग्रामीण भागांत पोपटीच्या मेजवान्यांची लगबग…..
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगडji24news
पालघर जिल्यातील विक्रमगड वाडा ग्रामीण आदिवासी भागात विशिष्ट हंगामातच तयार होणाऱ्या शेंगा ह्या त्याच हंगामात खाण्यासाठी काही खवय्यांची नेहमीच धडपड सुरू असते. सद्या थंडीमध्ये ग्रामीण भागात सर्वत्र वाल, तुरीच्या शेंगा, हुरडा तयार झाल्याने ग्रामीण भागात, शेतघरांकडे वळु लागल्याचे दिसत आहे. पोपटीची चव घेताना अनेक ठिकाणी मेजवान्यांची लगबग दिसत आहे.
वाडा, विक्रमगड तालुक्यात रब्बी हंगामात वाल, तूर व हरभराची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. दोन हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर तूर, वाल, हरभरा पिकाची पेरणी केली जाते. येथील निम्मेहून अधिक शेतकरी हिरव्या (कच्चा) हरभराची जास्त प्रमाणात विक्री करतात. ४० ते ६० रुपये प्रति किलो हरभराला भाव मिळत आहे.
वाल, पावटा, तुरीच्या शेंगा खास करून पोपटी बनविण्यासाठी खरेदी केल्या जातात. ६० ते ८० रुपये प्रति किलोने या हिरव्या शेंगांची विक्री होताना दिसते. विक्रमगड, वाडा, येथील बाजारपेठेत सद्या या शेंगा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पोपटी दोन प्रकारची बनवली जाते. शाकाहारी पोपटीसाठी वाल, तुरीच्या शेंगामध्ये बटाटे, रताळे व अन्य प्रकारच्या शाकाहारी हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. तर मांसाहारी पोपटीसाठी चिकन, अंडी यांचा वापर केला जातो.
Total Users : 10829