प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड आज दि.26/01/2024 रोजी प्रजासत्ताक दिनी व विक्रमगड पोलीस ठाणेच्या स्थापनेचा अमृत महोत्सव व जन संवाद अभियाना अंतर्गत बालविवाह व वेठबिगार विषयांवर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते या मार्गदर्शन शिबीराला जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.शैलेश काळे साहेब यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी भेट दिली.यावेळी विक्रमगड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. रविंद्र पारखे साहेब, मोखाडा पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रदिप गिते साहेब रमेश जाधव व यावेळी वाकी गावातील मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा वेळी वाकी गावातील गंगाराम महादू भडांगे विद्यालय येथील मुलांच्या गुण गौरव कार्यक्रमास उपस्थित होते