
नारी शक्ती महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम साजरा
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
संत तुकडोजी वार्ड मधील शिव मंदिर च्या प्रांगनामध्ये नारी शक्ती महिला मंडळातर्फे संक्रांति निमित्त भारती काळे, कोमल अवस्थी यांच्या पुढाकाराने हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला,
यामध्ये त्यांच्या मैत्रीचा गोडवा तिळगुळा सारखा टिकून राहावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ घेण्यात आले, या कार्यक्रमांमध्ये वार्डातील सर्व महिला महाराष्ट्रीयन वेशभूषेत उपस्थित होत्या, यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत एकल नृत्य, सामूहिक नृत्य, नाटिका यांचे सादरीकरण केले. तसेच टिकली खेळ, चमचा लिंबू स्पर्धा,संगीत खुर्ची, घे ताई उखाणा ,अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.व शेवटी सर्व महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून व वाण देऊन त्यांचा हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी संजीवनी म्हस्के, अर्चना उरकुडे, सुनीता हुलके, मीना झोरे, चित्रा खांडरे, गीता सुपारे,आशा वडमलवार, उषा कोहपरे,मीना तोमर, रेखा गंडाईत, अनिता महल्ले,सरला सोनवणे, रजनी डुकरे, पायल स्वा, विमल ढगे, अर्चना खडतकर, जयश्री घवघवे, प्रिया चौधरी, पल्लवी वसु, ग्रीष्मा आखाडे, पुष्पा बांगडे, पौर्णिमा मातनकर, गीता राऊत,सुनीता कोपूलवार,प्रणाली बालमवार, गीता पवार, नलिनी कुंभारे, नीता भाजीपाले, सविता वानखडे, मोनाली भारस्कर, स्वाती नेवारे, प्रभावती मेश्राम, मेघा घवघवें, सविता कोहपरे,अनघा देशपांडे आदी महिलांनी मोठ्या उत्साहामध्ये आपला सहभाग दर्शविला व आपल्या मधील असलेल्या कलागुणांची ओळख करून दिली.
Total Users : 10829