
रोलर ऍथलेटिक्स नॅशनल चॅम्पियनशीप – 2023-24 मध्ये सागर स्केटिंग ॲकॅडेमीची प्रभावी कामगिरी…
जोहार इंडिया 24 न्यूज मोखाडा
दि.11 फेब्रुवारी रोजी खोपोली येथे रोलर ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व स्कुल गेम फेडरेशन आयोजित, रोलर ऍथलेटिक्स नॅशनल चॅम्पियनशीप – 2023-24 आयोजित करण्यात आली होती. या चॅम्पियनशिपमध्ये कु.तक्षक रमेश पाटील याने 14 वर्षे वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना स्केटिंगच्या शॉर्ट व लॉन्ग रेसमध्ये गोल्ड मेडल्स,कु. दक्षतनया रामदास गाडर हिने लॉंग रेसमध्ये – सिल्वर मेडल व शॉर्ट रेस ब्रॉन्झ मेडल पटकावला आहे. तर कु. उत्कर्षा रामदास गाडर हिने 11 वर्षे वयोगटात शॉर्ट व लॉन्ग रेसमध्ये ब्रॉन्झ मेडल्स,कु. मृण्मयी रमेश पाटील हिने दहा वर्षे वयोगटात शॉर्ट व लॉन्ग रेसमध्ये ब्रॉन्झ मेडल्स पटकावून रोलर ऍथलेटिक्स नॅशनल चॅम्पियनशीप – 2023-24 मध्ये सागर स्केटिंग ॲकॅडेमीच्या स्केटर्सनी प्रभावी कामगिरी कामगिरी केलेली आहे.
मागील आठवडयात झालेल्या इंडुरन्स नॅशनल चॅम्पियनशिप – 2023- 24 मध्ये देखील सागर स्केटिंग ॲकॅडेमीच्या स्केटर्सनी पदक पटकावलेले आहेत. हे स्केटर्स मे महिन्यात श्रीलंका येथे होणाऱ्या इंडुरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
सागर स्केटिंग ॲकॅडेमीच्या स्केटर्सनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. हे सर्व पदक विजेते स्केटर्स सध्या सागर स्केटिंग ॲकॅडेमीच्या कल्याण,टिटवाळा या शाखांमध्ये मुख्य प्रशिक्षक – कुलदीप सागर सर व दिपक सागर सर , सहाय्यक प्रशिक्षक – भूपेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करत असून तंत्रे आत्मसात करत आहेत.
Total Users : 10829