
विक्रमगड मध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळावा…..
प्रतिनिधी-दीपक भोये. विक्रमगडji24news
विक्रमगड तालुक्यातील तहसील कार्यालय विक्रमगड येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत तहसील कार्यालय विक्रमगड व इतर यंत्रणा याच्या संयुक्त विद्यमानाने विक्रमगड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला विक्रमगड तहसीलदार मॅडम श्रीमती चारुशीला पवार, पंचायत समिती विक्रमगड सभापती यशवंत कनोजा , उपसभापती विनोद भोईर, पंचायत समिती सदस्य मनोज बोरसे ,
तुषार सांबरे,आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार, सभापती, कृषी अधिकारी,यांनी शेतकऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या मेळाव्याला तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शन झाल्यानंतर सरकारी योजनेचे शेतकऱ्यांना विविध योजनेचे फॉर्म भरण्यात आले. या मेळाव्याला विक्रमगड तालुक्यातील बहुसंख शेतकरी उपस्थित होते.
Total Users : 10829