
नवनियुक्त ठाणेदार PI मनोज गभने साहेब यांचेआखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघा द्वारे स्वागत.
प्रा.दिनेश राठोड -जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे नुकत्याच नव्याने रुजू झालेले नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने यांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघा द्वारे हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे भाऊराव कोटकर, हर्षाली सातघरे, सचिन महाजन, प्रवीण वरभे, राजा भैय्या ऊर्फ फैमोद्दीन, चंद्रशेखर शेडमाके यांनी ठाणेदार मनोज गभने यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उपस्थित पत्रकारांनी हिंगणघाट शहरात व वडनेर परिसरात वाढत्या गुन्हेगारी बाबत माहीती दिली.
हिंगणघाट,वडनेर, वर्धा नंदोरी,सातेफळ रोडनी प्रवास करण्यार्यांनी बिना हेल्मेट व गाडीचे कागदपत्र व चालत्या गाडीवर मोबाईल फोनवर बोलतानी प्रवास करून नये. व नियमांचे पालन करावे. यावर ठानेदार गभणे यांनी मार्गदर्शन केले. हिंगणघाट परिसरातील समस्ये बाबत चर्चा करण्यात आली.
पत्रकारांना आवश्यक ती माहिती व सहकार्य देण्याचे नवनियुक्त ठाणेदार गभणे साहेबांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी ठाणेदार यांनी, पत्रकारांनी उत्कृष्ट आपली कामगिरी करावी.
व पत्रकार हा चौथा स्तंभ असून पत्रकार हा निर्भीड असावा त्यांनी आपल्या लेखणीतून चांगले चांगले कामे करावी. असे मार्गदर्शन केले. व पत्रकारांसी संवाद साधला.
भाऊराव कोटकर, हर्षाली सातघरे, सचिन महाजन ,प्रवीण वरभे , राजा भैय्या ऊर्फ फैमोद्दीन, चंद्रशेखर शेडमाके यांनी नवनियुक्त ठाणेदार गभणे साहेबांचे पुष्प गुच्छ देवुन उपस्थित सर्व पत्रकारांनी पुढील कामा बद्दल शुभेच्छा दिल्या.
Total Users : 10828