ji24news

: पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी देणारे कार्यालय असूनही जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाला जोडल्या नसल्याने पगारासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.

 

पालघर प्रतिनिधि; पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी देणारे कार्यालय असूनही जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाला जोडल्या नसल्याने पगारासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.

            शासनाने दोन वर्षांपूर्वी या कार्यालयाला मंजुरी देऊनही अजून कारभार सुरूच झालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पगार, वेतन निश्चिती आणि भविष्य निर्वाह निधीसाठी ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध महत्त्वाची आस्थापने पालघर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आली. परंतु आज आठ र्वष उलटून गेल्यावरही त्यांची घडी बसलेली नाही. या गोंधळात नागरिकांची परवड होते आहे. वेतन आणि भविष्य निधी निर्वाह पथकाचे कार्यालय दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले. अधीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली, परंतु पालघर जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाशी जोडल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळ सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी अजूनही पालघर जिल्ह्याला वर्ग केला जात नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनाची बिले ठाण्याला जमा करावी लागतात. ही प्रक्रिया त्रासदायक असल्याने पगार वेळेवर निघत नाहीत. त्याचबरोबर वेतननिश्चिती पडताळणी पथकही अजून पालघर जिल्ह्यात कार्यान्वित केलेले नाही. त्यामुळे सेवेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनंत अडचणी येतात. शिक्षक सेवेत आल्यानंतर ३ वर्षांनी वेतन निश्चिती करावी लागते. यानंतर ८ वर्षांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि २४ वर्षांनी निवड श्रेणी अशा पद्धतीने पगार निश्चिती होते. हे पथकही पालघर जिल्ह्यात कार्यरत नसल्याने शिक्षकांच्या श्रेणी रखडल्या आहेत.

           वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाची गरजअसल्याची असून .
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय आणि स्वतंत्र विद्यापीठ यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन निश्चिती आणि भविष्य निर्वाह निधी यासंदर्भातील सर्व कामे या पथकामार्फत केली जातात. मात्र 
अनेक वेळा मागणी करूनही हे कार्यालय सुरू झालेले नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फार त्रास होतो आहे. पगारासंबंधित अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हे कार्यालय सुरू करावे.
असे सर्व शिक्षक संघटना पालघर, शिक्षक शिक्षकेतर संघटना पालघर यांची मागणी आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर