
लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात संपन्न.... मोखाडा: येथील रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील विज्ञान मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखेमधील सर्व विभागाने वेगवेगळे प्रयोग, रांगोळी, पोस्टर्स तसेच प्रश्नमंजुषा याद्वारे विज्ञान दिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा रमेश कवळे यांनी विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उद्देश व महत्व सांगितले तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक तसेच अनुजा अवकाश निरीक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री चंद्रकांत घाटाळ यांनी खगोलशास्त्रातील करिअरच्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व उपस्थित विद्यार्थ्यांना सर्व ग्रहाविषयी माहिती व प्रात्यक्षिके आपल्या टेलिस्कोप व दुर्बिणीद्वारे दाखवली. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. यानंतर डॉ.अरुण चांदोरे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व व विज्ञानामुळे मानवाला किती फायदा झाला तसेच संशोधनामध्ये नवतरुणांनी पुढे यावे व देशाला सक्षम बनवावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. संतोष मेंगाळ यांनी विज्ञानाने झालेली प्रगती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेलं योगदान यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून प्रा. विलास गाडे,प्रा. सुभाष फुंदे,प्रा.शेख ,प्रा.गांवडे,प्रा.हवाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण पारधी यांनी केले तर आभार प्रा. एस.आर.व्हंडे यांनी मानले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Total Users : 10828