
आदिवासी_तरुणीची_गगनभरारी प्रतिनिधी ji24news दीपक भोये विक्रमगड संभाजीनगर महानगर पालिकेत भरती होणारी पहिली महिला अग्निशामक........ नेतृत्व_आणि_कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही ते स्वतः ला निर्माण करावे लागते यांच मूर्तिमंत उदाहरण... आदिवासी समाजाची तरुणी अगदी उमलत्या वयात उराशी बाळगलेले स्वप्न खरं ठरल आहे अतिशय खडतर प्रशिक्षण आणि अग्निशमन सेवेचा अभ्यास करून चिकाटी जिद्द या गुणांनी आपले स्वप्न पुर्ण करून अग्निशमन सेवेत दाखल झाली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा आदिवासी तालुक्यातील राजेवाडी सारख्या अतिशय छोट्या आणि दुर्गम गावातील मुलगी पल्लवी राजेंद्र जागले जी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेत पुढील शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय वाडा येथे वस्तीगृहात राहून मराठी माध्यमातून शिकून पुढील शिक्षण विज्ञान शाखेतुन पदवीचे शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी येथून पहिल्या महिला अग्निशमन सेवेचे दाखल झाले आहे. प्रशिक्षण मुंबई महानगरपालिकेत वडाळा अग्निशमन केंद्र येथे पूर्ण करून प्रशिक्षनार्थी अग्निशामक म्हणून मागील २ वर्षांपासून सेवा बजावत असतानाच एकाच वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील कोकण - पश्चिम महाराष्ट्र - मराठवाडा या विभागामधील ३ महानगर पालिकांमध्ये एकाच वेळी महिला अग्निशामक पदी निवड झाली आहे. होणारी १ ली मुलगी अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवले आहे. सर्व आदिवासी समाजाकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.
Total Users : 10829