ji24news

९ विहिरीना टँकरने पाणी पुरवठा,नळातूनही गढूळ पाणी…

  • मोखाडा शहरातही पाणी टंचाईला सुरूवात….
  • ९ विहिरीना टँकरने पाणी पुरवठा,नळातूनही गढूळ पाणी…..
  • पालघर : सौरभ कामडी…
  • मोखाडा तालुक्यातील गावापाड्यांनी पाणी टंचाईचा उच्चांक गाठला असतानाच आता मोखाडा शहरातही पाणी टंचाईला सुरावात झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी आता टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे तर एक दिवसाआड वापरावयाच्या पाण्याचा पुरवठा होत असतानाच आता ते पाणीही गढूळ यायला लागल्याने शहर वासीयही आता पाणी टंचाईच्या दृष्ट चक्रात अडकल्याचे दिसून आले आहे यामुळे पाणी टंचाई आणि मोखाडा यांचे नाते काही केल्या संपण्याचे नावं घेत नसल्याचे समोर येत आहे. मोखाडा नगरपंचायत क्षेत्रातील तब्बल ९ विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त विहिरींवर अवलंबून असलेल्या शहार वासियांना आता टँकरचे पाणी प्यावे लागत आहे यामुळे सर्दी खोकला ताप या आजारांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
  • मोखाडा नगरपंचायत ही शहर आणि १२ पाड्यांत विभागलेली आहे यामुळे शहरातील दोन ते तीन विहिरींना याशिवाय घोसाळी, माळीपाडा, वारघडपाडा, आंबेपाना, मोरखडक, तेलीपाडा या पाड्याना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मोखाडा शहराला नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे मात्र जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नळाद्वारे येणारे पाणी हे फक्त वापरण्यासाठी वापरले नाते सदरची योजना अतिशय जुनी असल्याने विभाग निहाय एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो अशातच आता या उद्भावाचा पाणीसाठा कमी झाल्याने नळाद्वारे ही गढूळ पाणी यायला सुरवात झाल्याने वापरावयाचे पाणी सुद्द्धा अशुद्ध यायला लागले आहे यामुळे एप्रिल महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मे महिन्यात पाणी टंचाई शिगेला पोहचण्याची भीती व्यक्त असून नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.
  • एकूणच मोखाडा शहरातील या पाणी टंचाईला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी ३४ कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होवून त्यांच्या कामालाही सूरवात झाली आहे मात्र सदरचे काम पूर्ण होण्यासाठी किमान अजून वर्ष भराचा अवधी लागणार आहे यामुळे पुढील वर्षीही अशाच पाणी टंचाईचा सामना मोखाडा शहराला करावा लागणार आहे तर मोखाडा गाव पाड्याची स्थितीही अशीच असून जल जीवन मशीन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना पूर्ण होण्यास अजून वर्ष लागणार आहे त्याच वेळी तिच्या यशस्वीते बद्दल संशय व्यक्त होत आहे यामुळे पाणी टंचाईचे समूळ उच्चाटन होईल का हाच मुळात अनुत्तरीत प्रश्न आहे.
  • बॉक्स
  • पाणी टंचाईचा ग्रामीण रुग्णालया फटका
  • मोखाडा शहरतीलच एका विहिरीवरून मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला पाणी पुरवठा होत आहे मात्र त्याच विहिरीतील पाणी साठा कमी झाल्याने त्यानाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशावेळी आम्हालाही दररोज एक टँकर मिळावा अशी मागणी त्यांनी नगरपंचायतीकडे केली आहे यामुळे ग्रामीण रुग्णालयालाही पाणी टंचाईचा फटका बसला असून एकूणच ग्रामीण असो की शहर तालुक्यात पाणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर