ji24news

ग्रामीण भागात कौलारु घरे छावण्याची लगबग..

  • ग्रामीण भागात कौलारु घरे छावण्याची लगबग….
  • प्रतिनिधी दीपक भोये
  • विक्रमगड
  • पावसाचे आगमन होण्यापूर्वी खेडेगावात घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याची धडपड सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे होती. परंतु, अलीकडे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीकटचे छत असलेली घरकुले झाली. कवेलूची घरे कमी झाली. तरीही कौलारू घरे बहुतांश ग्रामीण भागात आहेत. आज शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडुजी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे किंवा छावणे असे म्हणतात. आज घर फेरणारे कारागीरही दुर्मीळ झाले आहेत.
  • कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत असून नाही. आजही खेड्यातपावसाळ्यापूर्वी कौलारू घरे साकारण्याचे काम केले जाते. ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी लोकांनी घरे छावण्यास सुरुवात केली असून बाबूंच्या बांबूच्या काड्या बदलण्याबरोबरच कवेलूंची करत आहेत. यंदा मजुरांची कमतरता असल्याने दुरुस्तीच्या कामावर परिणाम होत आहे. पावसाळ्यामुळे लोकांना आता घरे छावण्याची चिंता लागली आहे. हवामानात वारंवार बदल होत आहे. शेतकºयांनी मशागतीची तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत घर छावण्यासाठी मजुरांची कमतरता आहे. याशिवाय कामावर येणारे मजूर, पावसाळा जवळ आल्याने लवकरात लवकर घरे दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
  • काळानुसार बदल
  • आजच्या बदललेल्या युगात कौलारू घरांचे अस्तित्व केवळ खेड्यापाड्यांत टिकनु आहे. ग्रामीण भागातही लोक आता कवेलूऐवजी पक्की घरे बांधू लागले आहेत. एक काळ असा होता की पावसाळा आला की, कवेलू बनवणान्यांना उसंत मिळत नव्हती. पण आज परिस्थिती अशी आहे की, कवेलूंची मागणी कमी झाली आहे. आधुनिक युगात सर्वत्र सिमेंटच्या इमारती बांधल्या जात आहेत. शिवाय आता कवेलू बनविणारे मजूरही मिळत नसल्याने ग्रामीण भागातही कवेलूंची घरेही कमी होत आहेत.
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर