ji24news

पालघर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटरची सुविधा….

  • पालघर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटरची सुविधा आता….
  • मोबाइल सारखेच विजेचे मीटर रिचार्ज करण्याची सुविधा आता पालघरमधील ग्राहकांना मिळणार आहे.स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रांवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात उपकेंद्रांवर स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत.त्यानंतर ट्रान्सफॉर्मरवर आणि शेवटच्या टप्प्यात ग्राहकांना मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.दिवाळीपर्यंत पालघर जिल्ह्यातील 3 लाख 96 हजार 585 वीज ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.स्मार्ट वीज मीटरसाठी बारा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मोजणार आहे.केंद्र सरकारकडून मिळालेले अनुदान तुटपुंजे असल्याने वीज मीटरचे पैसे ग्राहकांकडून वसूल केले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.तर स्मार्ट मीटरच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात अशिक्षित ग्राहकांना रिचार्जची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.
  • विजेचे बिल अधिक आल्यानंतर सामान्य घरगुती ग्राहकांना धक्का बसतो.वाढत्या महागाई सोबत विजेचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले आहे.अशात महावितरण कंपनीकडून आता घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.ग्राहकांच्या पसंतीनुसार प्रीपेड आणि पोस्टपेड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक मीटरची किंमत 12 हजारांच्या घरात जात असून केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान प्रती मीटर 900 रुपये आहे.अदानी आणि एनसीसी कंपनीला प्रत्येकी दोन विभागाचे, तर मॉन्टेकार्लो आणि जिनस कंपनीला एका विभागाचे कंत्राट देण्यात आले आहे.
  • काय होणार बदल?
  • मीटरसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून पालघरमधील उपकेंद्र स्तरावर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात उपकेंद्रांवर स्मार्ट मीटर लावले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गणेश भारंबे यांनी दिली.पाच वर्षें मीटरची देखभाल दुरुस्ती ठेकेदारामार्फत केली जाणार आहे.
  • मिटरमुळे वीज चोरी आणि मीटरमध्ये छेडछाडीचे प्रमाण घटणार
  • रिचार्जप्रमाणे स्मार्ट वीज मीटर रिचार्ज करता येईल.
  • पोस्टपेड आणि प्रीपेड स्वरूपात उपलब्ध राहील.
  • मीटर रिडिंगसाठी कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही
  • दररोज विजेचा वापराची माहिती मिळणार आहे.
  • कंपनीला ग्राहकांच्या विजेच्या वापराचा डेटा आणि हिस्ट्री एका क्लिकवर मिळणार
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर