
अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान......
विक्रमगड प्रतिनिधी -ji24news. प्रशांत दाव्हाड
विक्रमगड - पावसाळा म्हटले कि शेतकरी आनंदी होतो, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भात, उडीद, तूर अश्या अनेक विविध प्रकारची पीक घेतली जातात. परंतु , पाऊस हा कधी पर्यंत असायला पाहिजे याचे पण मर्यादा असतो.
परंतु पीक होऊन आता काढायच्या वेळेवर पावसाने मोठे घात घेतले आहे असे म्हणायला वावगे जाणार नाही. पावसाने मोठे धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे दयनीय अवस्था होऊन आणि मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. असेच नुकसान विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील महसूल गाव चारणवडी (टीपोनपाडा) येथील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अति पावसामुळे भात हे पुर्णपणे पाण्याने बुडून गेले आहे आणि त्यातील उत्पन्न मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तरी सुद्धा तलाठी वैगरे यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे म्हणुन शेतकरी खूप नाराजगी व्यक्त करत आहे. तरी त्यासाठी मा. श्री.आमदार सुनील भूसारा साहेब आणि मा. श्री. हेमंत सवरा साहेब तसेच सरकार कडून अशी अपेक्षा आहे की याचे नुकसान भरपाई होईल का या शब्दात शेतकरी विनंती करत आहे. एव्हढी मेहनत घेउन तरी त्यामधून नुकसान होत आहे तरी याकडे सरकारचे लक्ष असावे, अशी शेतकरी बांधव सरकारला विनवणी करत आहेत.
Total Users : 10828