
न्यू युनिव्हर्सल चालतवड महाविद्यालयाची पालक सभा संपन्न..
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक ,विद्यार्थी व शिक्षक यांचा संवाद वाढला पाहिजे.
जव्हार : सुनिल जाबर
जन उत्कर्ष प्रबोधनी उधवा संचलित न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चालतवड महालेपाडा महाविद्यालयाची शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ ची पहिली पालक सभा ही शुक्रवारी पार पडली.
या दरम्यान स्वाती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जर तुम्ही शिक्षकांवर जबाबदारी दिली तर त्यांचेकडून शक्य होणार नाही त्यामध्ये पालकांची सुध्दा खूप मोठी जबाबदारी असते म्हणून विद्यार्थी ,पालक व शिक्षक एकत्रित मिळून जास्तीत जास्त संवाद करून , जीवनात विद्यार्थी चांगले कसे घडतील याकडे सर्व पालकांनी लक्षकेंदित करावे.तसेच साळुंके मॅडम यांनी देखील सध्या डिजिटल युगात विद्यार्थांनी मोबाईलचा योग्य तो वापर करावे या विषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर साखरशेत ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच अनिता चौधरी यांनी कमी वयात लग्न करू नये तर प्रत्येकाने उच्चशिक्षण घेवून आपल्या पालकांचे नावलौकिक करावे . व साखरशेत गटाचे केंद प्रमुख मधुकर भोये यांनी शिक्षणाबरोबरच खेळाला महत्त्व दिले पाहिजे तसेच एमपीएससी तसेच युपीएससी हे विद्यार्थी हे जास्तीत जास्त खेळाडूमधून झाले आहेत या विषयी मागदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल जाबर यांनी तर आभार प्रदर्शन किरण चौधरी यांनी केले
या प्रसंगी कॉलेजचे प्राध्यापक विकास भोये,तसेच सुनिल जाबर, करण खिरारी ,किरण चौधरी, तसेच पालक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Total Users : 10828