
विक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषद च्या शाळेत शिक्षिका राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षका पुरस्कार प्रदान….
प्रतिनिधी ji24news दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना आयोजित घाटोळे मंगल कार्यालय, कुरुल रोड, मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील कार्यक्रमात विनया विनोद डोहाळे यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार माजी शिक्षण संचालक प्रदीप मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा कोकणपाडा (आलोंडे) येथे राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग, विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, गणित इंग्रजी अध्ययन अध्यापनावर विशेष भर, वत्कृत्त्व स्पर्धा, हार्मोनियम वादन, नाट्यस्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धांत मोलाचा सहभाग, विविध प्रकारचे विशेष गुणवत्तापूर्ण शिक्षणविषयक शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित या पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग यांकडून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Total Users : 10828