
उटावली हायस्कूल उटावली येथे मुंबई विभाग तालुका स्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धा आयोजित .
विक्रमगड तालुका;-उटावली हायस्कूल उटावली येथे मुंबई विभाग तालुका स्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या क्रिडा स्पर्धेत जि. प. उच्च.प्राथ.शाळा डोल्हारी बुद्रूक शाळेतील मुलींचा संघ कबड्डी क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाला.
त्याप्रसंगी विक्रमगड तालुका क्रीडा प्रमुख मा. श्री. अरविंद ठाकरे सर, राज्यस्तरीय कबड्डी पंच मा. श्री. लक्ष्मण सुतार सर, राजुदादा देसले, प्रशिक्षक कोच श्री. संतोष गणपत उमतोल, शा. व्या. समिती सदस्य श्री. मगन खरपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या विद्यार्थिनींच्या विजया बद्दल विक्रमगड तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद,दादडे केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री रोडे साहेब, डोल्हारी बुद्रूक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. विलास चौधरी सर, व शिक्षक वृंद, तसेच डोल्हारी बुद्रूक ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. विलास गहला साहेब, उपसरपंच, सदस्य तसेच शा. व्या. समिती सदस्य, ग्रामस्थ, एकंदरीत संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून या विजेत्या मुलींचे गोड कौतुक केले जातआहे.
Total Users : 10828