
भारतीय तंत्रज्ञान मुंबईच्या ३२ विद्यार्थ्याचा दाभलोन गावात दोन दिवसीय ग्रामीण अभ्यास दौरा
जव्हार : सुनिल जाबर
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या ३२ विद्यार्थ्यांचा ग्रामीण अभ्यास दौरा जव्हार मधील दाभलोन ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाला.ग्रामीण भागातील राहणीमान त्यांचे जीवन पद्धती घरे संस्कृती रुढी परंपरा बोलीभाषा अनुभवाकरीता दोन दिवसीय निवासी कार्यशाळा हे दाभलोन (साखळीपाडा) येथे झाले त्यांचे दोन दिवसांचे नियोजन गावांचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी केले होते.
सकाळी गावकरी व त्यांची स्वतःची एकमेकांशी ओळख केली. गाव आणि नदी, डोंगर परिसर पाहणी केली. पारंपारिक वाद्य तूर – थाली, तारपा नृत्य सादर. दुपारी त्यांची आणि गावकऱ्यांची एकत्र जेवणाची व्यवस्था. IIT बद्दल माहिती घेऊन आपल्या संस्कृती बद्दल देवाणघेवाण. संध्याकाळी तीन- तीन गट तयार करून वेगवेगळ्या घरी भोजन आणि निवासाची व्यवस्था केली. रात्री ग्रह, तारे पाहण्याचा कार्यक्रम गावकऱ्यांसोबत अतिशय सुंदर पध्दतीने झाला. तर दुसऱ्या दिवशी झालेल्या विकास कामांची पाहणी केली. गावात असलेल्या रुग्वाहिकेला आणि ई- स्मार्ट क्लिनिक ला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. जवळ असलेल्या दाभोसा धबधबा पर्यटन स्थळाला भेट. गावातील लहान मोठे महिला मंडळींना भेट देऊन संवाद साधुन अडचणी जाणून घेतल्या. दवाखाना, बँक, माध्यमिक शिक्षण, एस टी वाहनव्यवस्था संदर्भात मुलांच्या व्यथा. गावातील युवा मंडाळाच्या एकतेचा, संघर्षाचा, कार्याचा कौतुक करत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुपारी गावकऱ्यांसमवेत जेवण केले. गावाबद्दल त्यांचा आपापला अनुभव. गावकऱ्यांचे व सर्वांत मोठा विकासाचा वाटा असणारे गावचे सरपंच यांचे आभार मानत सर्व परिवाराची स्तुती केली यानंतर संध्याकाळी निरोप घेत परतीचा मार्ग घेतला
Total Users : 10828