ji24news

नेवरे गाव ( शहापूर )शेलवले पाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव .

मौजे नेवरे गाव ( शहापूर )शेलवले पाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव .शहापूर – ( सचिन शेलवले )मौजे नेवरे गावातील शेलवले कुटुंबामध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात . या वर्षी या शेलवले पाड्यातील गणेशोत्सवाने ३४ व्या वर्षात पर्दापण केले आहे . हा सात दिवसाचा गणेश उत्सव श्री . दयानंद गोपाळ शेलवले यांच्या घरी बसविण्यात आला आहे . प्रत्येक कुटुंबात पाच पाच वर्ष गणपती ठेवला जातो . अशा प्रकारे प्रत्येक पाच वर्षाने फिरता गणपती प्रत्येक कुटुंबात ठेवला जातो . गणपती सणानिमित सर्व शेलवले परिवार तसेच आप्त नातेवाईकांची रेलचेल असते . सर्वजण पहिल्या दिवसापासुन नियमित आरती, हरिपाठ तसेच नंतर जागर नृत्य काम करतात . यात सर्व जण मनोभावाने सामील होतात . शेलवले पाड्यातील महिलामंडळ एकत्र येऊन हरितालिका सण, त्रप्रषिपंचमी व गौरीच्या सणानिमित्त एकत्र येऊन सण साजरा करतात . रात्रीचे जागर भजन, संगीत गाणी तसेच नृत्य काम करतातत . यामध्ये सर्व महिलांचा समावेश असतो . नव तरुण बालगोपाळ तसेच तरुण युवक हे सुद्धा एकत्र येऊन नृत्य व खेळात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतात . आता सर्व जबाबदारी नवयुवकांवर टाकलेली आहे . त्याची जबाबदारी चोखपणे ते सांभाळतात . या दिवसात लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, जोडप्यांसाठी, सासू सुनांसाठी अनेक मनोरंजक खेळ घेऊन विजयी झालेल्या प्रथम आलेल्याला बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविला जातो . यावर्षी स्वःतच्या आर्थिक खर्चातून श्री . रुपेश दयानंद शेलवले व सौ . निता रुपेश शेलवले यांनी स्वतहून अनेक प्रकारचे मनोरंजक खेळाचे नियोजन करून तसेच प्रत्येक खेळाला बक्षिसाचे वितरण स्वहस्ते केले . त्याला सर्वांकडुन खुप प्रतिसाद मिळाला . एकत्र येऊन पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तसेच शेवटच्या दिवशी भोजन पक्वानाचे आयोजन करून जेवणाचा आस्वाद घेतात . ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे . त्यामुळे या सणानिमित्त सर्व शेलवले परिवार गुण्यागोविंदाने एकत्र येतात व या सणातील आनंदाचा आस्वाद घेतात . या वर्षी नवतरुण शेलवले परिवारातील मंडळाचे अध्यक्ष गणेश दत्तात्रय शेलवले यांनी सुंदर नियोजन करून यावर्षी चांगल्या प्रकारे सहकार्य केले . या अध्यक्षांचे तसेच ज्यांनी मनोरंजक खेळ घेऊन बक्षिसाचे वितरण केले त्यांना मंडळाकडुन खुप खुप धन्यवाद देण्यात आले . तसेच ज्यांनी यामध्ये सिंहांचा वाटा घेतला त्यांचे सुद्धा मंडळा कडुन खुप खुप कौतुक .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर