
नाद घुमतोय खानदेश बँडचा बोईसरमध्ये.. .बोईसर : पावसाळ्यात संपूर्ण कोकण हिरव्यागार रंगात न्हाऊन निघतं. पावसाळा मनाला आनंद देत असला तरी, तो जेव्हा रौद्र रूप धारण करतो, तेव्हा तो घरं आणि शहरं उध्वस्त करून टाकतो. सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि परिस्थिती खूपच कठीण आहे.परिस्थिती कितीही भयंकर असली तरी महाराष्ट्र या संकटाचा कणखरपणे सामना करतो. अशा परिस्थितीत, गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे गणपती विसर्जनासाठी थेट धुळ्याहून ‘खानदेश बँड’ बोलावण्यात आला होता. खानदेश मित्र मंडळाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी, आपली संस्कृती जपून, तब्बल ४०० किलोमीटरहून खानदेशी बँडची व्यवस्था केली होती.आजच्या जगात गणपतीची मूर्ती आणि डीजे यांसारख्या गोष्टींवरून अनेक मंडळं एकमेकांमध्ये स्पर्धा करताना दिसतात. पण कोणत्याही देखाव्याला किंवा मोठ्या डीजेला महत्त्व न देता, गेल्या १२ वर्षांपासून खानदेश मित्र मंडळ अशाच प्रकारे सांस्कृतिक पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे. ‘आपली संस्कृती जपून बाप्पाला निरोप देतानाचं हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारं असतं,’ असं खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाले म्हणाले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सचिन अशोक पाटील आणि खजिनदार रामकृष्ण महाले सुद्धा उपस्थित होते.

Total Users : 10828