ji24news

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली धोकादायक रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषण व सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठक संपन्न.

*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली धोकादायक रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषण व सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठक संपन्न. पालघर – विष्णू गाडर. दि. ५ सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील धोकादायक व अतिधोकादायक रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधील प्रदूषण नियंत्रण, कामगारांची सुरक्षा व आपत्कालीन उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.यावेळी आमदार राजेंद्र गावित यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे. जिल्ह्यातील उद्योग व्यावसायिक , जिल्ह्यातील तहसीलदार (दूरदुष्य प्रणाली द्वारे )उपस्थित होते.या बैठकीस जिल्ह्यातील विविध रासायनिक कारखान्यांचे भोगवटादार, व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, कामगार उपआयुक्त आणि संलग्न प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी रासायनिक कारखान्यांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कामगारांना नियमित प्रशिक्षण, कार्यशाळा, तसेच रंगीत तालीम (Mock Drill) आयोजित करण्याचे आणि प्रत्येक कामगार आपत्कालीन परिस्थितीत सक्षमपणे प्रतिसाद देईल याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रासायनिक कारखान्यांमध्ये होऊ शकणाऱ्या वायुगळती, आग, स्फोट व प्राणघातक अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित सुरक्षा लेखापरीक्षण, प्रशिक्षण व रंगीत तालीम अनिवार्यपणे राबविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले कामगार उपआयुक्त, पालघर यांनी कारखान्यांतील कामगारांच्या कौशल्य विकास (Core Competency Development) संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांनी कामगार सक्षम व प्रशिक्षित झाल्यास अपघातांची शक्यता कमी होईल व उद्योगक्षेत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम होईल .जिल्ह्यातील सर्व रासायनिक कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना, नियमित प्रशिक्षण व रंगीत तालीम यावर अधिक भर देऊन कामगारांची सुरक्षितता व उद्योगांची जबाबदारी याची जाणीव ठेवून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.बैठकीत उपस्थित सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा व प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर