ji24news

रानभाजी महोत्सवाने खुडेदच्या वैतागवाडी पेसा गावात निसर्गाचा सन्मान

*रानभाजी महोत्सवाने खुडेदच्या वैतागवाडी पेसा गावात निसर्गाचा सन्मान*

*रानभाजी महोत्सवाने खुडेदच्या वैतागवाडी पेसा गावात निसर्गाचा सन्मान*

दि. 5/09/2025 : विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीमधील पेसा गाव वैतागवाडी येथे आज रानभाजी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यावर भर देण्यात आला.
विक्रमगडच्या निसर्गसंपन्न आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या रानभाज्या हा इथल्या लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना या भाज्यांचे पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती देण्यात आली. यात विविध प्रकारच्या रानभाज्या जसे की, कवळा, टाकळा, कुरडू, शेवग्याची पाने, अंबाडी,बाफळी, लोत, माठ, टेटू, खरशेंग यांसारख्या एकूण 26 रानभाज्यांचा समावेश होता.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 महिलांनी स्वतःच्या शेतातून आणलेल्या ताज्या रानभाज्यांचे प्रदर्शन केले. या भाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थही उपस्थितांना चाखायला मिळाले. स्थानिक महिलानी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावले होते, ज्यामुळे त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.
हा कार्यक्रम केवळ रानभाज्यांबद्दल माहिती देणारा नव्हता, तर आदिवासी संस्कृती, निसर्ग आणि पारंपरिक जीवनशैली यांचा संगम साधणारा एक अनोखा अनुभव होता. या कार्यक्रमामुळे रानभाज्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, अशी भावना वयम् चळवळीच्या सहसंस्थापिका दिपालीताई गोगटे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुबंईचे हर्जितजी शिंग,दिपकजी पवार,संदिपजी पाटील,कविताताई पाटील, राजेंद्रजी मोरे,जव्हारचे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉ. अनिताताई पाटील, धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मधुकरजी मालकरी, साखरे वनपाल हेमंतजी शिंदे,वनरक्षक खुडेद प्रदीपजी भंडारी, साखरे तलाठी सुरजजी जाधव,सातकोर तलाठी महेशजी भोये, केशवसृष्टीचे विक्रमगड विस्तारक गणपतजी धांगडा, खुडेद गावचे सरपंच श्री. लहू नडगे,अंगणवाडी सेविका रेखाताई महाले, आशा सेविका संगीताताई मोरे,पेसा मोबिलायझर सुशिलाताई पाटारा,उमेदच्या सिआरपी कुंताताई हरपाले,कल्पनाताई पाटारा,अरुणाताई टोपले, राजश्रीताई राथड,रामकृष्ण मिशनच्या गीताताई हरपाले, खुडेद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नारायणजी भोये, शिक्षक चंदूजी लहांगे,तांडेलपाडा पेसा गावातील निलेश कोदे,सुतारपाडा पेसा गावातील नितीन तांबडा, आणि वैतागवाडी पेसा गावातील दिनकर चौधरी, नंदा पाटारा,निलेश पांढरा इत्यादी ग्रामस्थ तसेच शाळेतील लहान मुलांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला.
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर