ji24news

७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण.

७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण.

*७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण*

    भाद्रपद पौर्णिमा,रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी एक महत्वाची खगोलीय घटना म्हणजे या तारखेच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल.

    रविवार ७ सप्टेंबरच्या रात्री ९.५७ मिनिटांनी ग्रहणाला सुरवात होऊन मध्यरात्री ११ .४२ ला ग्रहणाचा मध्यकाळ असेल. तर रात्री १.२७ वाजता ग्रहण संपेल. यात खग्रास काळ रात्री ११ वा. पासून उत्तरात्री १२.२२ पर्यंत असेल. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ३ तास ३० मिनीटे असेल तर खग्रास कालावधी सुमारे १ तास २३ इतका मिनिटे असेल.

   धार्मिक विधी नुसार अनेक विधी, व्रत.. सांगितले आहेत. ते विधी, व्रत  पाळणे न पाळणे हा ज्याचा त्याचा आस्थेचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी मी स्वतः मात्र याकडे एक अद्भुत खगोलीय घटना या दृष्टीने पाहतो. खासकरून चंद्रग्रहण.. कारण सूर्यग्रहणात प्रखर किरणांचा उघड्या डोळ्यांना त्रास होतो. हे सत्य असले तरी  चंद्रग्रहणात मात्र तसे नाही.कोणतेही चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो; यासाठी कोणत्याही  ग्रहणचष्म्याची आवश्यकता नाही.

    सध्या आपल्या पालघर जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने ढगाळ वातावरणामुळे हे खग्रास चंद्रग्रहण दिसेलच असे नाही. तरी ज्याला जसं शक्य आहे तसं त्याने या अद्भुत खगोलीय घटनेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आम्ही आमच्या अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा तर्फे करत आहोत. हे खग्रास चंद्रग्रहण आपण रात्री ९.५७ ते १.२७ पर्यंत आपल्या गच्चीवरून किंव्हा मोकळ्या जागी आकाशात उघड्या डोळ्यांनी  सहज पाहू शकता;म्हणून आमच्या केंद्राने काही विशेष सोय केलेली नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

   – चंद्रकांत घाटाळ
संचालक – अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र Salm

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर