
*केबीसी मध्ये चंद्रकांत घाटाळ यांना संधी मिळणार ?* सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुप व केबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या *Force for Good Hero’s* या उपक्रमात पालघर जिल्ह्याचा अभिमान असलेले खगोल अभ्यासक व लेखक श्री. चंद्रकांत घाटाळ यांच्या सामाजिक व वैज्ञानिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या “अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र, कासा” या केंद्रामार्फत ग्रामीण भागातील मुलांना खगोलीय विज्ञानाची माहिती व प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. हे निस्वार्थी कार्य ते सातत्याने करीत आहेत. याच उल्लेखनीय कार्याच्या जोरावर त्यांची *फोर्स फॉर गुड हिरोज* या उपक्रमात त्यांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीचा अधिकृत इमेल कंपनीकडून पाठवण्यात आला आहे. यात प्रमाणपत्रासह त्यांचा नोंदणी क्रमांक आहे. यात अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासाचे संचालक म्हणून चंद्रकांत घाटाळ यांच्या नावाची नोंद घेण्यात आली आहे.या उपक्रमाअंतर्गत बऱ्याच सामाजिक संस्थांची नोंदणी असून .. त्यातील काही संस्थांची निवड कार्यक्रमासाठी होणार आहे. यात घाटाळ यांच्या केंद्राची निवड होईल असा विश्वास घाटाळ यांनी व्यक्त केला.
Total Users : 10828