
महाराष्ट्र शासन आयोजित,ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी स्पर्धेत श्री गाडगे महाराज भिवाळी आश्रमशाळेचा ( गणेशपुरी ) बास्केटबॉलमध्ये प्रथम क्रमांक. सचिन वझरे महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यावतीने जिल्हानिहाय विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन कडून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करियर घडवण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात नुकत्याच या स्पर्धेला सुरुवात झाली असून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत श्री गाडगे महाराज आश्रम शाळा भिवाळी, १४ व १७ वर्षे वयोगटातील मुला मुलींनी घवघवीत यश संपादित करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाशिंद येथील श्री. गाडगे महाराज आश्रम शाळेच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण २० पेक्षा अधिक शाळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत श्री गाडगे महाराज आश्रम शाळा-भिवाळी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत मुंबई विभागीय स्तरावर मजल मारली असून पुन्हा एकदा बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या अगोदर देखील या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी केली होती. या क्रीडा स्पर्धेतील यशामुळे या सर्व खेळाडूंचे सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे. या कामगीरी मुळे श्री गाडगे महाराज मिशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. श्री गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक- अनिल आवटे, माध्यमिक मुख्याध्यापक- अनिल पदमने, प्राथमिक मुख्याध्यापक – चंद्रकांत चौधरी, अधिक्षक – किरण सुर्वे, अधिक्षिका – सविता पाटील व बास्केटबॉलचे प्रशिक्षक कपिल सावंत, प्रिती कानडे, योगिता बसवत, निखिल कामडी व शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Total Users : 10828