ji24news

कातकरींच्या अस्तित्वासाठी आणि हक्कासाठी ‘ श्रमजीवी संघटनेचे’ आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन.

*कातकरींच्या अस्तित्वासाठी आणि हक्कासाठी ‘ श्रमजीवी संघटनेचे’ आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन. विक्रमगड प्रतिनिधी- प्रशांत दाव्हाड (ji24news ) विक्रमगड – देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे. लहान मुलांच बालपण खुडून नेल जातंय, त्यांचं माणूस म्हणून जगणेच नाकारलं जातंय. दारिद्रय अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उदवस्ततेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेने आता या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे. निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी – विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेलं शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधःकारात लोटले गेले आहे. वनहक्क, गावठण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाळ, रुपेश डोळे आणि ठाणे जिल्हा प्रमुख जया पारधी, पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पऱ्हाड इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करत आहेत. अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावा पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात, पाड्या पाड्यात आपल्या घरा दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावणार आहेत. आंदोलन स्थळीही आज हा दिवा संध्याकाळी लागणार आहे. आत्मक्लेशातून आत्मनिर्धार हा ५ नोव्हेंबर २०२५ रोजी ते ६ नोव्हेंबर २०२५ रोजी असे दोन दिवस होत आहेत. गुरुवारी ६ नोव्हेंबरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणार आहेत. हा केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तिवासाठी ‘निर्धार’ आहे. अशी माहिती श्रमजीवी संघटनेने दिलेली आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर