ji24news

घानवळ गावातील जंगलात वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितिचे वातावरण .

घानवळ गावातील जंगलात वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराट…

मोखाडा प्रतिनिधी – रामदास गाडर

              जंगलच्या राजाचा रुबाब व आक्रमकता सर्वश्रुत आहेच ; किंबहुना हे सुंदरबनातील वाघांच्या जीवनावरील आधारित ‘रोअर’ या हिंदी चित्रपटात ही आक्रमकता आणि तसेच वाघ आपल्या पिल्लांना वाढवताना किती काळजी घेतो हे बघितलं आहे.मात्र हा थरारक फिल्मी अनुभव सध्या मोखाडा तालुक्यातील (जि.पालघर ) घानवळवासीय घेत आहेत.
घानवळ गावाच्या जगंलालगत नासिक जिल्ह्याची हद्द असून तोरंगण,नीलमती,आडगाव – देवळा हा दाट जंगलाचा पट्टा आहे.त्यामुळे या परिसरात कायम जंगली हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. याचाच एक भाग म्हणून सध्या घानवळच्या जंगलात व गावालागत वाघ आपल्या दोन पिल्लांसह वावरत आहे.त्यामुळे घानवळ या महसुली गावातील जांभूळमाथा,रुईपाडा आणि बलद्याचापाडा येथील ग्रामस्थ भयभीत झाले शेतातील कामे लवकर आटोपून येत असून संध्याकाळ झाली की ते घराबाहेरदेखील पडत नाहीत. याच वाघाने श्री.गंगा कांदडे यांच्या दोन गायिंचा फडशा पडला आहे.त्यामुळे नागरिकांना भीतीबरोबरच आर्थिक नुकसानीला देखील सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी मोखाडा येथे वनविभागाला कळवले असून या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. त्याअनुषंगाने मोखाडा वनविभागाने वाघाने शिकार केलेल्या गायिंचा पंचनामा केला असून ते या संदर्भात बारीक लक्ष ठेवून आहेत.तसेच त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता सुरक्षितता म्हणून संध्याकाळी लवकर शेतात घरी यावे व रात्री घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर