
पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दिल्या शुभेच्छा.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या समृध्दीसाठी प्रार्थना केली आहे.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले,
“महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.या राज्याने राष्ट्राच्या प्रगतीसाठी अपूर्व योगदान दिले आहे.राज्यातील जनतेने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजाविली आहे.मी महाराष्ट्रातील जनतेच्या समृध्दी साठी प्रार्थना करतो.”
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2022
महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.
Total Users : 10828