ji24news

मुंबई, 21 मे : मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर (kolhapur, sangli, solapur) जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) थैमान घातले होते.

मुंबई, 21 मे : मागील दोन  दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर (kolhapur, sangli, solapur) जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) थैमान घातले होते.

दरम्यान आज (दि. 21 मे) पावसाने दिवसभरात पावसाने थोडी उसंत दिली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा (imd alert) पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. गोवा, कर्नाटक आणि लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर तसेच केरळ घाट परिसरात मोठे ढग साचून आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (weather forecast)
याचबरोबर मान्सूनची वाटचाल बरोबर चालू असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत केरळच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा : Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत 5 ते 6 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचीत हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले.
हे ही वाचा : हाताला रोजगार नसल्याने निवडला अवैध मार्ग; 23 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
राज्यात हवामान विभागाने (imd alert) दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(kolhapur, sangli satara heavy rainfall) दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rains) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली आहे. शेतीची मशागतीची कामे जिथल्या तिथे थांबली तर उन्हाळी सोयाबीन, केळी, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथे एका शेतकऱ्याने थेट सोयाबीन फेकून दिले तर पंढपूरच्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असताना, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीन कापणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे आधीच शेतकऱ्याची फसवणूक झाली असताना, हे दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी पावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहायला मिळाले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर