
संघर्ष इच्छा नाही तर गरजा पूर्ण करण्याचा….
पालघर जिल्हा – रामदास गाडर सर ✍️
आज मोखाडा ते विक्रमगड असा प्रवास करत असताना जव्हारसोडल्यावर जुनीजव्हार फाट्याच्या पुढे दोन मुले जांभळे आणि करवंदे विकायाला बसलेले दिसले. त्यांच्यासोबत थांबून संवाद साधत असताना त्यांना म्हटलं की जांभळीचं झाड कडक असून त्याच्या फांद्या लवकर मोडतात म्हणून काळजीपूर्वक जांभळं पाडावीत असं सुचवत असताना ते म्हणाले की वडिलांनी जांभळं आणि करवंदे तोडून दिली आणि ते शेतीच्या कामाला गेले आहेत. कुणाल प्रकाश कुरबुडे ( 7 वी ) आणि साईनाथ प्रकाश कुरबुडे ( 5 वी ) ही जि.प.शाळा काळीधोंड ता.जव्हार च्या शाळेत शिक्षण घेत आहेत. जुजबी व्यवहारज्ञान असताना ही मुले आत्मविश्वासाच्या जोरावर सढळ हाताने केवळ 10 रुपयाला पसभर जांभळे आणि करवंदे विकत होती. कदाचित , त्यांना ग्राहकांचे समाधान महत्वाचे वाटत असावं असं मला जाणवलं. तरीही त्यांना जांभळाचे थोडे लहान वाटे केले तर अधिक पैसे येतील याबाबत थोडं प्रॅक्टिकल मार्गदर्शन केले आणि पुढील प्रवासाला निघालो. ” निसर्गातील रानमेवा हंगामानुसार आवर्जून खावा.” ????????????

Total Users : 10829