
“सुपा फार्म व रोटरी उत्कृष्टता”…….
आपल्या विद्यालयातील इयत्ता १० वी मध्ये पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थ्यां या पुरस्काराने सन्मानित व पारितोषिक दिले जाणार आहे..
पालघर जिल्हा : प्रतिनिधि :
उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. मला खात्री आहे पालघर जिल्ह्याचा निकाल खूप चांगला असेल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा. जे अनुत्तीर्ण होतील त्यांनी निराश होऊ नये, अपयश ही यशाची पहिली पायरी समजून चांगले प्रयत्न करावेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील खूप खूप शुभेच्छा. डहाणू व तलासरी तालुक्यातील मुख्याध्यापकांना विनंती करतो की, आपल्या विद्यालयातील इयत्ता १० वी मध्ये पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे व त्यांच्या गुणपत्रिकेची झेराक्स आपल्या लेटरहेड सह “सुपा फार्म व रोटरी उत्कृष्टता’. पुरस्कारासाठी पाठवावीत. त्यांना सन्मानपूर्वक अनुक्रमे ५,३,२ हजार रोख पारितोषिक व सन्मानपत्र दिले जाणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून केला जातो. कार्यक्रम समन्वयक, प्राचार्य डॉ. भगवानसिंग अ. राजपूत, कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय तलासरी.
यांच्याकडे त्वरित यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पाठवावीत. नावे पाठविण्याची अंतिम तारीख २५ जून २०२२ आहे. त्यानंतर आलेली नावे पुरस्कारासाठी स्वीकारली जाणार नाहीत, याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी. हा संदेश सर्व विद्यालयापर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करावा. ही विनंती.
आपला प्राचार्य डॉ. राजपूत.
संपर्क ;-8007183970
Total Users : 10828