ji24news

Maharashtra Board SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२. रोजी दुपारी 1 वाजता .

Maharashtra Board SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी-

तसेच, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ वाजल्या नंतर उपलब्ध होतील. @msbshse @MahaDGIPR. या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck.ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी देखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
याचबरोबर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहीत आहोत, की आपण सगळेजण दोन वर्षांपासून करोनाशी लढत आहोत. अशावेळी या परीक्षा घेण्यात आल्या, खूप मेहनतीने, कष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणि संयमाने आपण आपला अभ्यास पूर्ण केला आणि या परीक्षेला सामोरे गेलात. आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल आणि विद्यार्थी किंवा पालकवर्गात थोडं टेंशनही असेल, की परीक्षेचा निकाल कधी लागणार. तर, मी आजच्या या संवादातून सांगू इच्छिते की इयत्ता दहावीचा निकाल १७ जून(उद्या) दुपारी १ वाजता ल लागणार आहे. खाली दिलेल्या विविध संकेतस्थळाच्या माध्यामतून तुम्ही हा निकाल पाहू शकता.आपण केलेल्या अभ्यासाला यश मिळणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना हीच शुभेच्छा देते, की उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय आणि उत्साहचा असो.”

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याबाबत समस्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता होती.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर