ji24news

विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा भागातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पालघर । महावितरणच्या पालघर मंडळांतर्गत वीजवाहिन्यांचे नुतनीकरण व वीज वितरण यंत्रणेच्या क्षमतावृद्धीची कामे कार्यान्वित झाल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा भागातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

            दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून डहाणू ते गंजाड दरम्यान साडेआठ किलोमिटर ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचे नुतनीकरण व क्षमतावृद्धी करण्यात आली असून याच योजनेतून बोईसर एमआयडीसी येथील महापारेषणच्या २२०/३३ केव्ही विराज अती उच्चदाब उपकेंद्रातुन २०.५ किलोमीटर लांबीची स्वतंत्र उच्चदाब वीजवाहिनी विक्रमगड (औंदे) ३३ केव्ही उपकेंद्रासाठी उभारण्यात आली आहे.
            डहाणू गाव वीज उपकेंद्रातुन निघणाऱ्या व १०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबी असलेल्या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनी द्वारे डहाणू तालुक्यातील ३३ केव्ही गंजाड, ३३ केव्ही सूर्यानगर आणि जव्हार तालुक्यातील ३३ केव्ही जव्हार व मोखाडा तालुक्यातील ३३ केव्ही मोखाडा, ३३ केव्ही खोडाळा या वीज उपकेंद्राना व त्यावरील सर्व सुमारे ६० हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या ३३ केव्ही उच्चदाब वीज वाहिनी चा प्रामुख्याने सावटा नाका डहाणू ते चेतक फार्म गंजाड हा भाग डोंगराळ व जंगलातून जात असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या सध्या या उच्चदाब वाहिनीसाठी सावटा नाका डहाणू ते चेतक फार्म गंजाड या भागात नव्याने स्वतंत्र ३३ केव्ही उच्चदाब वीज वहिनी उभारण्यात आली आहे. तसेच डहाणू गाव ते गंजाड या भागातील उच्चदाब वाहिनीचे जीर्ण झालेले सर्व विजेचे खांब, त्यावरील चॅनल्स, इतर फॅब्रीकेशन व वीजतारा (१०० स्क्वेअर एमएम ऐवजी २०० स्क्वेअर एमएम) बदलण्यात आल्या आहेत. नव्याने उभारण्यात आलेली साडेआठ किलोमीटर लांबीची वीजवाहिनी ही जंगलातून गेलेल्या वीजवाहिनीला पर्याय म्हणून रस्त्याच्या बाजूने टाकल्यामुळे तातडीने बिघाड शोधून जलदगतीने दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. परिणामी जवळपास ६० हजार ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यात मोलाची मदत होईल.
पूर्वी विक्रमगड तालुक्यातील वीज ग्राहकांना पालघरमधील महापारेषणच्या १३२ केव्ही अती उच्चदाब उपकेंद्रातुन निघणाऱ्या ३३ केव्ही मनोर वीज वाहिनीद्वारे वीजपुरठा करण्यात येत होता. या वाहिनीची ५० किलोमिटर असलेली लांबी व मनोर परिसरातील डोंगराळ व जंगलाचा भाग यामुळे वीज पुरवठ्याबाबतच्या तक्रारी होत्या. आता नव्याने उभारणी करण्यात आलेली २०.५ किलोमिटर लांबीची ३३ केव्ही वीजवाहिनी ही बोईसर एमआयडीसी ते नागझरी, चरी, चिल्हार फाटा, नांदगाव, जव्हार फाटा मार्गे मनोर अशी रस्त्याच्या बाजूने उभारण्यात आली आहे. त्यामुळे विक्रमगड येथील ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार असून वीजवाहिनीच्या बिघाडाचे प्रमाणही घटणार आहे. तसेच मनोर वीज उपकेंद्रावरील ग्राहकांनाही पर्यायी व्यवस्था म्हणून ही वीजवाहिनी मोलाची ठरेल.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर